विवाह जुळवतानाचे 36 गुण | जमलं हो जमलं
Manage episode 346973902 series 3263262
Sisällön tarjoaa Jamal Ho Jamal. Jamal Ho Jamal tai sen podcast-alustan kumppani lataa ja toimittaa kaiken podcast-sisällön, mukaan lukien jaksot, grafiikat ja podcast-kuvaukset. Jos uskot jonkun käyttävän tekijänoikeudella suojattua teostasi ilman lupaasi, voit seurata tässä https://fi.player.fm/legal kuvattua prosessia.
नमस्कार मंडळी, कसे आहेत? आपल्या जमलं हो जमलं ला फॉलोव करताय ना? अजूनही तुम्ही जमलं हो जमलं ला सोशल मीडिया वर फॉलोव केलं नसेल आपलं युट्युब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आटा आवर्जून करा. कारण आम्ही आपल्यासाठी घेऊ येत असतो लग्नासंबंधित वेगवेगळ्या विषयांवर माहिती. आपल्याकडे विवाह जुळवताना वधू-वरांची पत्रिका जुळतेय का पाहिली जाते. अनेकांना प्रश्न पडतो की गुणमिलन करताना कोणत्या बाबी पहिल्या जातात आणि त्याला किती गुण असतात? आज आपण त्याबद्दल माहिती घेऊ : #विवाह_जुळवतानाचे_३६_गुण (टीप : पत्रिका पाहणे किंवा न पाहणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. एखाद्याची श्रद्धा असते किंवा नसते पण. जमलं हो जमलं त्याबद्दल काहीही टिपण्णी करत नाही. #जमलं_हो_जमलं च्या माध्यमातून आम्ही फक्त माहिती देत आहोत.) सुरु करूयात विवाह जुळवतानाचे ३६ गुण - १) वर्ण (१ गुण) : या प्रकारात १२ राशींची ४ चार प्रकारच्या वर्णात विभागणी केली आहे. विप्र, क्षत्रीय, वैश्य आणि शुद्र. वैचारिक पातळीवर यांची विभागणी केली आहे. २) वश्य (२ गुण) : या प्रकारात चंद्र नक्षत्रानुसार वधू-वरांची स्वभाव वैशीष्ट्ये एकमेंकासाठी किती अनुकूल आहेत हे पाहीले जाते. यात जलचर, वनचर, किटक, मानव, चतुष्पाद यानुसार विभागणी केली जाते. ३) तारा (३ गुण) : याला नक्षत्रगुण असेही म्हणतात. वधू-वरांची चंद्रकुंडली आधारीत जन्मनक्षत्र एकमेकांपासून किती अतंरावर आहेत ते पाहीले जाते. जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यारी, साधक, बाधक, मित्र आणि अतीमित्र अशा ९ प्रकारात याची विभागणी केली आहे. ३, ५ आणि ७ क्रमांकाचे नक्षत्र सोडून इतर जन्मनक्षत्र एकमेंकासाठी पुरक आहेत अस मानतात. ४) योनी (४ गुण) : जातकाचा जन्म अश्व, गज, मेष, सर्प, श्वान, मार्जार, गौ, व्याघ्र, वानर, मंगुस, सिंह, मृग, उंदीर, म्हैस या १४ पैकी नेमक्या कोणत्या योनीवर झाला आहे ते पाहतात. त्यानुसार वधू-वर हे एकमेकांसाठी शारीरीक दृष्ट्या पुरक आहेत का, त्यांच्यात परस्पर आकर्षण टिकेल का इत्यादी गोष्टी ह्यावरून पाहतात. ५) ग्रह मैत्री (५ गुण) : चंद्र राशी वरून ग्रहांची एकमेकांशी मैत्री आहे की शत्रुत्व आहे, ते पाहीले जाते. वधूवरांच्या जन्मराशीचे स्वामी एकमेकांचे मित्र असावेत, मित्र नसतील तरी चालेल पण शत्रू नसावेत असे मानले जाते. ६) गण (६ गुण) : देवगण, मनुष्य गण, राक्षस गण असे तीन गण आहेत. कोणत्या नक्षत्रावर जन्म आहे, त्यावरून हे ठरते. योनी प्रमाणे ह्याचाही विचार स्वभाव कसा असेल यासाठी केला जातो. ७) राशी कुट (७ गुण) : वधू-वरांची चंद्र राशी एकमेकापांसून कितव्या स्थानावर आहे त्यानुसार हे गुण दिले जातात, या राशी एकमेकापासून ६ किंवा ८ स्थानी असेल तर मृत्यूषडाष्टक योग होतो. तसेच नवीन संशोधनानुसार राशी एकमेकांपासून १२ वी रास येत असेल तर वैवाहीक सौख्याला हे सगळ मारक ठरत. ८) नाडी (८ गुण) : नाडीचे एकूण तीन प्रकार प़़डतात आद्य, मध्य, अंत्य. शारीरीक संरचना (अंतर्गत) आणि अनुवंशिकता याचा विचार यात केला जातो. यालाच आयुर्वेदात कफ, पित्त, वात या तीन प्रकारात विभागले आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार भिन्न नाडी या एकमेकांसाठी पुरक असतात. अशा प्रकारे या ८ मुद्द्यांना घेऊन पत्रिका पहिली जाते आणि गुणमिलन किती होतंय हे ठरवले जाते. पत्रिका बघणे किंवा न बघणे हा प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे. जमलं हो जमलंच्या माध्यमातून आम्ही फक्त माहिती देत आहोत. आपण जर लग्नासाठी स्थळं शोधात असाल तर जमलं हो जमलं ला नक्की भेट द्या. जमलं हो जमलं ही वेबसाईट मुलींसाठी १००% फ्री आहे. इथे मुली फ्री मध्ये रजिस्टर करून स्थळे पाहू शकतात. त्याचप्रमाणे मुलांसाठी सुद्धा ५०% डिस्काउंट आहे. तर एकदा नक्की भेट द्या. आपल्या सोशल मीडिया पेजेस ला फॉलोव करायला आणि युट्युब चॅनेल ला सबस्काईब करायला अजिबात विसरू नका. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेल्याच आहेत. आणि हो जमलं हो जमलं ला जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचावा. पुन्हा भेटूया असाच एखादा विषय घेऊन. धन्यवाद..!
…
continue reading
7 jaksoa