# 1607: हवेहवेसे पाहुणे...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Manage episode 447019933 series 3431535
अशीच एका जहाजातून निघालेल्या पारशी कुटुंबांची नौका गुजरातला नवसारी इथल्या किनाऱ्यावर येऊन पोहचली. तिथल्या राजा समोर त्यांना उभं करण्यात आलं. त्यांचा म्हातारा प्रमुख समोर आला. राजाला व त्याला एकमेकांची भाषा येत नव्हती.
राजाने एक दुधाने काठोकाठ भरलेला पेला मागवला आणि त्या पर्शियन लोकांच्या प्रमुखाला सुचवलं की आमचा देश असा काठोकाठ भरलेला आहे आता आम्हाला आणखी माणसे नकोत.
तेव्हा तो पारसी माणूस हसला. त्याने त्या दुधात थोडासा मध टाकला. त्याचा अर्थ होता की आम्ही इथे दुधात मध मिसळल्या प्रमाणे राहू व या देशाची गोडी वाढवू. राजा खुश झाला. त्याने पारसी लोकांना भारतात राहण्याची परवानगी दिली.
1625 jaksoa